एमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांची चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करण्याचे आवाहन

एमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांची चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करण्याचे आवाहन
Published on: 

एमपीएससी गैरव्‍यवहार : किकर

पुरावे, निवेदने १६ नाेव्‍हेंबरपर्यंत सादर करा

नऊ परीक्षांप्रकरणी चाैकशी आयाेगाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नऊ स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चाैकशी आयाेग नेमला आहे. या आयोगाचे कार्यालय वांद्रे-कुर्ला संकलातील अन्न व औषध प्रशासन भवन सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणांशी संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी आणि अन्य व्यक्तींना निवेदने आणि पुरावे १६ नोव्हेंबरपर्यंत आयोगाकडे सादर करावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तथा आयाेगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगात अध्यक्षांसह एकूण पाच सदस्य आहेत. मुंढे हे सदस्य सचिव असून, पोलिस विभागातील कार्यरत तसेच निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.
एमपीएससीच्या नऊ परीक्षांशी संबंधित बाबींची आयोग चौकशी करणार आहे. त्यामध्ये औषध निरीक्षक परीक्षा गट-ब २०२५, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४, अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा २०२३, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ यांचा समावेश आहे. या परीक्षांतील कथित गैरव्यवहारांबाबत कोणाकडे माहिती, तक्रार किंवा संबंधित कागदपत्रे असल्यास त्यांनी ती आयोगासमोर सादर करावीत, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. दालन क्रमांक २०१, दुसरा मजला, अन्न व औषध प्रशासन भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई या पत्त्यावर संबंधितांनी १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत या पत्त्यावर निवेदने सादर करावीत, असे आवाहन आयोगाने केले आहे.

प्रतिज्ञापत्रासह निवेदन सादर करा!
संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, अन्य व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांना म्हणणे मराठी किंवा इंग्रजी भाषेत लेखी स्वरूपात मांडता येणार आहे. निवेदन प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करणे आवश्यक असून, त्यासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात. निवेदनाची एक प्रत आयोगाने दिलेल्या ई-मेल पत्त्यावरही पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.