

प्रकल्पबाधितंना ३०० चौ. फु.चे घर द्या!
गोपाळ शेट्टी यांची मागणी
मुंबई ता. ३० : विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मुंबईतील नागरिकांना २२५ नव्हे, तर सध्याच्या तरतुदीनुसार ३०० चौ. फुटांचे हक्काचे घर देण्यात यावे. जुन्या निर्णयाच्या आधारे २२५ चौ. फुटांची घरे देण्याची कार्यवाही तातडीने थांबवावी, अशी मागणी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकाचे घर तोडू नये आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत तोडक कारवाई स्थगित ठेवावी, असे आवाहनही त्यांनी महापालिका प्रशासनाला केले आहे.
याबाबत शेट्टी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या पत्राची प्रत सभागृह नेते गणेश खणकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनाही देण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत गटनेत्यांच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले. दुकानधारकांना दुकानाऐवजी निवासी सदनिका हवी असल्यास पूर्वी प्रति चौ. फूट ६५४ रुपये भरावे लागत होते, मात्र आता ही रक्कम तब्बल सहा लाख २५ हजार रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेत अशा प्रकारचे घर विनामूल्य दिले जाते. त्यामुळे वर्षानुवर्षे मुंबईत वास्तव्यास असलेल्या प्रकल्पबाधितांवर एवढा आर्थिक भुर्दंड लादणे अन्यायकारक असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रश्नावर आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असल्याचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.