

दिवा स्थानकात आज मध्यरात्री ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : दिवा रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेकडील पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेकडून शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरला पहाटे १.१० ते ४.२५ या वेळेत मुंब्रा ते दातिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक असेल. या कामामुळे लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दिवा स्थानकातील कल्याणच्या दिशेकडील पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रोड क्रेनच्या सहाय्याने गर्डर बसवण्याचे काम पूर्ण केले जाईल. या कामासाठी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. या ब्लॉकमुळे १ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस मध्यरात्री १२.४५ ऐवजी पहाटे ४ वाजता सुटणार आहे. त्यामुळे ही गाडी नियोजित वेळेपेक्षा तीन तास १५ मिनिटे उशिराने रवाना होईल. दरम्यान, गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस निळजे स्थानकात पहाटे ३.३४ ते ४.२५ या वेळेत थांबवून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.