

अभिनेता अजय देवगणची उच्च न्यायालयात धाव
‘विमल’ जाहिरात प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : विमल इलायचीच्या जाहिरातीत झळकल्याप्रकरणी राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने शुक्रवारी (ता. ३०) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
‘एफडीए’ने अजय देवगण याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीत, विमल इलायचीच्या जाहिराती विमल पान मसाला या महाराष्ट्रात बंदी घातलेल्या चघळण्याच्या (च्युएबल) उत्पादनाच्या सरोगेट जाहिरातीसाठी पैसे देतात, असा आरोप केला आहे. एफडीएने याच जाहिरातीत अजयसह झळकलेला अभिनेता शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अजयने याचिकेद्वारे एफडीए नियमांमधील तरतुदींच्या घटनात्मकतेला आव्हान दिले आहे. तसेच, एफडीएने बजावलेली ही नोटीस निर्मात्या कंपनीला न देता त्यात काम केले म्हणून थेट आपल्याला मनमानी पद्धतीने बजावण्यात आल्याचा दावा केला आहे. याआधी, पीबी ॲग्रो या उत्पादनाच्या उत्पादकाने ऑगस्टमध्ये नोटीस रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अजय देवगणच्या याचिकेवर मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर ४ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
..
प्रकरणे संयुक्त आयुक्तांकडे : मुंढे
संबंधित तिघा कलाकारांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटिसांना तिघांनीही उत्तर देत बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानंतर सक्षम प्राधिकारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांनी या प्रकरणातील कार्यवाही पूर्ण करून सुनावणी संपवली आहे. आता पुढील निर्णयासाठी ही प्रकरणे संयुक्त आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली तसेच न्यायालयीन प्रक्रियेचा संदर्भ असला तरी एफडीएकडून प्रकरणातील कार्यवाही सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.