

काँग्रेसला अराजकता पसरवू देणार नाही!
‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव;’ गोयल यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : देशात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आम्ही अराजकता पसरवू देणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ रॅलीत ते बोलत होते.
सरदार पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकतेशिवाय जनशक्ती निर्माण होऊ शकत नाही, हा त्यांचा विचार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश याच एकतेच्या भावनेतून पुढे जात असल्याचे गोयल म्हणाले. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरूनही गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर टीका केली. एसआयआर ही नवीन प्रक्रिया नाही. मतदार यादीत चुकीची नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा संबंधित ठिकाणी वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे असतील तर ती कायम का ठेवावीत, असा सवाल त्यांनी केला. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले, तरी त्यांनी लोकशाही संस्थांवर प्रश्न उपस्थित केले नाहीत; मात्र राहुल गांधी निवडणूक आयोग, संसद आणि न्यायालयासारख्या संस्थांवर सातत्याने टीका करीत असल्याचा आरोप गोयल यांनी केला.
---
नेते काय म्हणालेत?
आमदार योगेश सागर यांनी ही रॅली लोकशाहीच्या रक्षणासाठी असल्याचे सांगितले. आमदार अतुल भातखळकर यांनी ही पदयात्रा अराजकतेला उत्तर देणारी असल्याचे म्हटले. आमदार मनीषा चौधरी यांनी मोठ्या संख्येने झालेली नागरिकांची उपस्थिती ही मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला मिळालेला पाठिंबा असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.