आशा स्वयंसेविकांना पाच हजारांचा बोनस

आशा स्वयंसेविकांना पाच हजारांचा बोनस
Published on: 

आशा स्वयंसेविकांना पाच हजारांचा बोनस
मुंबई, ता. १ : महापालिकेच्या अखत्यारीतील आशा स्वयंसेविकांपाठोपाठ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) कार्यरत ७१९ आशा स्वयंसेविकांनाही प्रत्येकी पाच हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळणार आहे. महापौर रितू तावडे यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण दोन हजार १८० आशा स्वयंसेविकांना यंदा प्रत्येकी पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

महापालिकेच्या अखत्यारीतील एक हजार ४६१ आशा स्वयंसेविकांसाठी यापूर्वी पाच हजार रुपयांची भाऊबीज भेट जाहीर करण्यात आली होती, मात्र राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकाही आरोग्यसेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांनाही या लाभात सामावून घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. दरम्यान, महापालिकेतील दोन हजार ३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (सीएचव्ही) प्रत्येकी १४ हजार रुपये, तर दोन हजार ३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी सात हजार रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा व आरोग्य स्वयंसेविका तसेच बालकांच्या शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्या कामाची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. या सर्व घटकांची दिवाळी आनंदात जावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.