राज्याच्या सागरी क्षेत्रात जागतिक गुंतवणुकीची संधी

राज्याच्या सागरी क्षेत्रात जागतिक गुंतवणुकीची संधी
Published on: 

राज्याच्या सागरी क्षेत्रात जागतिक गुंतवणुकीची संधी

नितेश राणे; रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : राज्याच्या बंदर आणि सागरी क्षेत्रात आतापर्यंत ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले आहेत. बंदरे, जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांत जागतिक गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात उद्योग उभारावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीतून राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित चौथ्या ‘मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्स्पो’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) वतीने २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत नेदरलँड्स, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती या नऊ देशांनी सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून, नैसर्गिक बंदरे, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी अनुकूल व्यवस्था ही राज्याची बलस्थाने आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला सागरी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करताना एक खिडकी परवानगीसारख्या सुविधांवर भर दिला जात असल्याचे राणे यांनी सांगितले.

मुंबई वॉटर मेट्रोवर भर
राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रोसारख्या प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे. बंदरांची क्षमता वाढविणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करणे तसेच निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे नियोजन असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.