

मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’
पाडव्यापासून १६ डब्यांची!
आसनक्षमता होणार दुप्पट
मुंबई, ता. २ : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी पाडव्यापासून (ता. १०) आठ डब्यांची ही गाडी १६ डब्यांसह धावणार आहे. त्यामुळे सध्याच्या ५३० आसनांऐवजी प्रवाशांसाठी १,१२८ आसने उपलब्ध होणार आहेत.
मुंबईहून कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वंदे भारत एक्स्प्रेसला विशेष पसंती मिळत आहे. आठ डब्यांची मर्यादित क्षमता असल्याने अनेकदा प्रतीक्षा यादी मोठी असते. पर्यटन आणि सलग सुट्टींच्या हंगामात या गाडीचे आरक्षण मिळणे अनेकदा कठीण होते. आता ही गाडी १६ डब्यांसह धावणार असल्याने अधिक प्रवाशांना लाभ मिळणार आहे.
---
देखभालीसाठी जुना संच नागपूरला!
सध्या धावणारी आठ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस ९ नोव्हेंबरला शेवटची फेरी पूर्ण करणार आहे. त्यानंतर या गाडीचा संच देखभाल-दुरुस्तीसाठी अजनीला (नागपूर) पाठविण्यात येणार आहे. त्याऐवजी १० नोव्हेंबरपासून या मार्गावर १६ डब्यांची वंदे भारत धावणार आहे. ही व्यवस्था एका महिन्यासाठी असेल, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
---
कायमस्वरूपी डबेवाढीची मागणी
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर कायमस्वरूपी १६ डब्यांची गाडी सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने ५ जूनला रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हंगामापुरती होणारी डबेवाढ कायमस्वरूपी करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.