

महापालिकेला मिळणार नवे सभागृह
४४.८७ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जागा अपुरी पडत असल्याने शेजारच्या ‘टाऊनहॉल जिमखाना’च्या भूखंडावर प्रशासकीय व क्रीडा वापरासाठी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. सुमारे ३२० नगरसेवक व लोकप्रतिनिधींची क्षमता असलेल्या सभागृहासह महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र दालने, पत्रकार कक्ष, अत्याधुनिक व्यायामशाळा, बॅडमिंटन कोर्ट अशा विविध सुविधा या इमारतीत असणार आहे. ४४ कोटी ८७ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.
टाऊनहॉल जिमखान्याचा भूखंड पूर्ण क्षमतेने वापरात नसल्याने त्याचा पालिकेच्या प्रशासकीय आणि क्रीडाविषयक कामांसाठी प्रभावी वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा वारसा जपत या जागेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सुधारित आराखड्यानुसार, दोन तळघरे, तळमजला आणि चार मजले अशी इमारतीची रचना असेल. तळघरात दोनस्तरीय कार पार्किंग, पहिल्या ते चौथ्या मजल्यावर अंतर्गत पार्किंगसह व्यायामशाळा, इनडोअर खेळांसाठी जागा आणि बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर मे. डी. टक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने १२.९६ टक्के कमी दराने निविदा सादर केली होती. त्यामुळे या कंपनीची कंत्राटदार म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यादेश दिल्यानंतर पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
----
इमारतीतील विशेष सुविधा
- महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र दालने व कार्यालये
- सुमारे ३२० नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या क्षमतेचे प्रशस्त सभागृह
- पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष
- व्ह्यूइंग गॅलरी, काचेचा घुमट, कॅप्सूल लिफ्ट आणि कॅफेटेरिया
- सौरऊर्जानिर्मिती आणि सांडपाण्याच्या पुनर्वापराची यंत्रणा
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.