

महाराष्ट्राला नवोपक्रमांचे केंद्र बनविणार!
महाराष्ट्र उच्च शिक्षण परिषदेचे उद्घाटन
मुंबई, ता. २ : उच्च शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना देशाच्या विकासात योगदान देणारा सुजाण नागरिक बनवणे हा आहे. त्यासाठी महाराष्ट्राला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि एलेट्स टेक्नोमीडियाच्या सहकार्याने डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण बनविणे आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात यावेत, संशोधकांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषद २०२६ हे त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.
---
कुशल मनुष्यबळ घडवणार!
बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजांनुसार उद्योग व बाजारपेठेला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडविणे, संशोधन व नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम बनविणे, ही उच्च शिक्षण विभागाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.