लोकलमधील सराईत मोबाईल चोरटा जेरबंद

लोकलमधील सराईत मोबाईल चोरटा जेरबंद
Published on: 

लोकलमधील सराईत मोबाईल चोरटा जेरबंद
११ गुन्ह्यांची नोंद; एक लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावून तसेच झोपलेल्या प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या वांद्रे युनिट क्रमांक सहाच्या गुन्हे शाखेने सोमवारी (ता. २) अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसईत सापळा रचून त्याला जेरबंद केले. रोहित मांजी सातळ्या ऊर्फ खारबा (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि सोन्याचे मंगळसूत्र, असा एकूण एक लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर २३ ऑक्टोबरला सकाळी ९.१९ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली होती. फलाटावर उभी असलेली भाईंदर लोकल सुटत असताना एका अनोळखी व्यक्तीने प्रवाशाच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी चर्चगेट रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. हा आरोपी वसई रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीकडून दोन मोबाईल आणि ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.

विविध रेल्वे पोलिस ठाण्यांत ११ गुन्हे
रोहित सातळ्या हा वसई रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे पुलाखाली राहत होता. त्याच्याविरुद्ध लोहमार्ग आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध रेल्वे पोलिस ठाण्यांत यापूर्वी ११ गुन्हे दाखल आहेत. वडाळा, सीएसएमटी, अंधेरी, कल्याण, मुंबई सेंट्रल, बोरिवली आणि वसई रेल्वे पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. २०२१ पासून त्याच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीतून समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.