समृद्धी महामार्गाला ‘सुरक्षा कवच’

समृद्धी महामार्गाला ‘सुरक्षा कवच’
Published on: 

समृद्धी महामार्गाला ‘सुरक्षा कवच’

४२० पोलिसांची नियुक्ती; १५ मदत केंद्रांसह स्वतंत्र नियंत्रण कक्ष मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : समृद्धी महामार्गावरील वाढत्या लूटमारीच्या घटना, वाहनचालकांवरील हल्ले आणि डिझेलचोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी ४२० नियमित पोलिस पदे, १५ महामार्ग पोलिस मदत केंद्रे आणि स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे ५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे लूटमार, डिझेलचोरीसारख्या घटनांपासून बचावासाठी वाहतूकदारांना सुरक्षा कवच मिळणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे सल्लागार आणि माजी अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी स्वागत केले आहे. समृद्धी महामार्गावर ट्रकचालकांना लुटणे, शस्त्रांचा धाक दाखवून हल्ले करणे, डिझेलचोरी, खंडणी वसुली आणि अपुरी गस्त यांसारख्या समस्या गंभीर बनल्या होत्या. या प्रश्नांवर १ जून ते २८ सप्टेंबर २०२६ दरम्यान सरकारकडे सहा वेळा निवेदने देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली होती, असे सिंह यांनी सांगितले. मंजूर केलेल्या यंत्रणेची तातडीने अंमलबजावणी करून महामार्गावर २४ तास गस्त, प्रभावी सीसीटीव्ही देखरेख, आपत्कालीन हेल्पलाइन आणि अपघात अथवा वाहन बिघाडाच्या वेळी त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सुरक्षित महामार्गामुळे चालक, वाहतूकदार आणि प्रवाशांचा विश्वास वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.