समाजाचा विश्वास हीच डॉक्टरची कमाई

समाजाचा विश्वास हीच डॉक्टरची कमाई
Published on: 

समाजाचा विश्वास हीच डॉक्टरची कमाई
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : डॉक्टर होणे ही केवळ पदवी नाही. समाजाचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई आहे. रुग्णांना उपचारांसोबत मानसिक आधार आणि विश्वास देणे ही डॉक्टरांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांनी सेवाभाव, संवेदनशीलता आणि उत्तम रुग्णसंवादाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक हजार ४४० नवनियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. नवनियुक्त डॉक्टरांमध्ये सुमारे ७०० महिला डॉक्टरांचा समावेश आहे. पारदर्शक आणि गुणवत्ताधारित प्रक्रियेतून ही भरती करण्यात आली आहे. नियुक्त्यांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे. आणखी ६२१ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रुग्णांना उपचार मिळण्यासाठी प्रशासकीय फाइलची वाट पाहावी लागू नये, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. डॉक्टरांसाठी चांगली निवासव्यवस्था, स्वच्छ परिसर, औषधसाठा, शुद्ध पाणी आणि सुसज्ज शस्त्रक्रियागृहे उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-----
पुढील टप्प्यात ६०० डाॅक्टर भरणार
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील एकही आरोग्य संस्था डॉक्टरविना राहू नये, असा शासनाचा निर्धार असल्याचे सांगितले. पुढील टप्प्यात ६०० डॉक्टरांची भरती, एक हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि ३५० नवीन १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.