आता शेलू हेच आमचे गिरणगाव!

आता शेलू हेच आमचे गिरणगाव!
Published on: 

आता शेलू हेच आमचे गिरणगाव!
गिरणी कामगार संघर्ष समिती शेलूच्या घराबाबत सकारात्मक; सरकारने किमती कमी कराव्यात, प्रकल्प तातडीने पूर्ण करावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यास सरकार असमर्थ ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने आता शेलू हेच आमचे गिरणगाव म्हणत गिरणी कामगार संघर्ष समितीने शेलूच्या घराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, मात्र सरकारने या घरांच्या किमती कमी करण्याबरोबरच प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशी मागणी केली आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वतीने नुकतेच वसई पश्चिम येथे मुंबईतील विभागवार कार्यकर्त्यांचे शिबिर पार पडले. या शिबिरात ७० ते ८० कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सरकारच्या घरांबाबतच्या धोरणावर केलेल्या चर्चेतून सरकार बोलते एक आणि करते दुसरेच असा सूर कामगारांनी काढत नाराजी व्यक्त केली. सरकारने काढलेल्या गेल्या तीन जीआरमध्ये घरांसाठी निविदा मागवल्या गेल्या, मात्र त्यात मुंबईत घर देण्याचा उल्लेखच नसल्याचा आरोप कामगारांनी केला. दिवसेंदिवस घरांचा प्रश्न अधिक जटिल होत असल्याने आता वाट पाहणे शक्य नसल्याचे सांगत, शेलू येथे घरे घेण्यास आमची तयारी आहे, मात्र सरकारने घरांच्या किमती कमी करून प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली. शेलू मध्येच आम्ही गिरणगाव साकार करू, असा आत्मविश्वास कामगारांनी व्यक्त केला. या वेळी शिबिराला समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग, सचिव प्रविण येरुणकर, मारुती जाधव, लक्ष्मण ओंबळे, बाबन राणे, प्रकाश नाईक आदी उपस्थित होते.

जे मिळते ते स्वीकारून पुढे संघर्ष
राज्य सरकारकडून सध्या जे मिळते ते स्वीकारून पुढील हक्कासाठी पुन्हा संघर्ष करण्याचा निर्णय या शिबिरात घेण्यात आला. खटाव मिल, सेन्च्युरी मिल, एनटीसी गिरण्या आणि ज्या गिरण्यांची जमीन मिळणे बाकी आहे, त्यांना पाठिंबा देऊन लढा सुरू ठेवण्याचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.