

प्रदूषण करणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला एसआरएचा दणका
११६ प्रकल्पांना काम बंद करण्याची नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) कठोर पावले उचलली आहेत. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ११६ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना काम बंद करण्याची नोटीस बाजववली आहे. त्यामुळे संबंधित झोपडपट्टी गृहनिर्माण प्रकल्पांना प्रदूषणाबाबतच्या त्रुटी दूर केल्यानंतरच काम सुरू करता येणार आहे.
मुंबई महापालिकेने यापूर्वी प्रदूषण नियंत्रणाबाबत परिपत्रक काढले होते. त्याआधारे एमआरटीपी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या प्रकल्पांवर कारवाई झाली, त्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेले ग्रीन पडदे लावलेले नव्हते, धुळीवर नियंत्रणासाठी स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित नव्हती आणि नियमावलीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने नोटीस देत काम बंद करण्यास बजावले असल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
३८७ प्रकल्पांचे काम सुरू
सध्या मुंबईत एसआरए अंतर्गत एकूण ६२३ गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी ११६ प्रकल्पांवर नोटीस बजावून कामे थांबवण्यात आली आहेत, तर सुमारे ३८७ प्रकल्पांमध्ये कामे नियमांचे पालन करून सुरू आहे.
त्रुटीच्या पूर्ततेनंतरच काम सुरू
नोटीस दिलेल्या विकसकांनी त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय त्यांना काम पुन्हा सुरू करता येणार नाही. ग्रीन नेट, पाण्याची फवारणी (स्प्रिंकलर), बांधकाम साहित्य झाकून ठेवणे यांसारख्या उपाययोजना करणे बंधनकारक असून, यापुढेही नियम मोडणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई सुरूच राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.