

कूपर रुग्णालयाची रक्तपेढी दोन दिवस बंद राहणार
एफडीएची राज्यभर कारवाई
मुंबई, ता. ५ : तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित केला आहे. त्यामुळे ५ आणि ६ नोव्हेंबरला रक्तपेढीचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे.
रक्तपेढीच्या सर्व सेवा ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार असून, ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून त्या पुन्हा सुरू होतील. या कारवाईमुळे कूपर रुग्णालयातील रुग्णांना रक्त आणि रक्तघटक मिळवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. रक्तपेढी बंद असण्याच्या कालावधीत रुग्णांना रक्त किंवा रक्तघटकांची आवश्यकता भासल्यास जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाच्या रक्तपेढीतून व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑक्टोबर २०२६ या एका महिन्यात राज्यातील ४३ रक्तपेढ्या आणि ५७ रक्त साठवणूक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण १९० रक्तपेढ्या आणि २१९ रक्त साठवणूक केंद्रांची तपासणी करण्यात आली. या सात महिन्यांच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या पाच रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले, तर ४० रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय १३ रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून, ३७ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.