ऐन दिवाळीत वाहतूक काेंडी

ऐन दिवाळीत वाहतूक काेंडी
Published on: 

ऐन दिवाळीत वाहतूक काेंडी

खरेदीसाठी बाहेर पडलेले मुंबईकर त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदी, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची रस्त्यांवर मोठी गर्दी होत आहे. त्यातच वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने मुंबई आणि महानगर परिसरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
शुक्रवारी पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गासह शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत बराच काळ प्रवासी अडकले हाेते.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दादर, मज्जीद, सीएसएमटी परिसरात बाजारपेठा, मॉल, व्यापारी संकुले आणि विविध खरेदी केंद्रांकडे नागरिकांचा ओघ वाढला आहे. सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी जाणारे नोकरदार आणि खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक यांची एकाच वेळी रस्त्यांवर गर्दी होत आहे. आधीच वाहनांच्या गर्दीचा ताण असलेल्या मुंबईतील रस्त्यांवर वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विमानतळाच्या टर्मिनल दोनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याची तक्रार वाहनचालकांनी केली. अंधेरी पूर्वेतील चकाला सिग्नल, सिगारेट फॅक्टरी परिसर आणि सहार रोडवरील सेवा रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
------
‘एक्स’वरून तक्रारी
वाहतूक कोंडीबाबत अनेक नागरिकांनी ‘एक्स’वर मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांना टॅग करून तक्रारी केल्या. काही ठिकाणी वाहतूक पोलिस किंवा वॉर्डन उपस्थित नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. सणाच्या काळात वाहतूक नियोजन, प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची नियुक्ती आणि बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.