महापालिकेच्या कायदा अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर!

महापालिकेच्या कायदा अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर!
Published on: 

महापालिकेच्या कायदा अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : बोरिवलीतील बेस्ट बस आगारासाठी आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात झालेल्या दिरंगाईचे पडसाद महापालिका प्रशासनात उमटू लागले आहेत. या प्रकरणात महापालिकेच्या कायदा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांच्याकडील विधी खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडील संपूर्ण कामकाज संयुक्त कायदा अधिकारी सुखश्री मिलिंद मोदले यांच्याकडे सोपविण्याचा आदेश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे. त्यामुळे पंजाबी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (ता. ६) यासंदर्भातील कार्यालयीन आदेश जारी केला.

बोरिवलीतील बेस्ट बस आगारासाठी आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिले होते, मात्र त्याची वेळेत अंमलबजावणी न झाल्याने ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने आयुक्त अश्विनी भिडे यांना अवमानाची नोटीस बजावण्यासोबतच महापालिकेला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला तसेच आयुक्त आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देशही दिले. या प्रकरणानंतर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रफुल्ल तांबे आणि कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचेही समोर आले होते. आता कोमल पंजाबी यांच्याकडील विधी खात्याचा संपूर्ण कार्यभार काढून घेतल्याने महापालिका प्रशासनातील कारवाईची व्याप्ती वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.