

महापालिकेतील ६९५ अभियंत्यांच्या बदल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महापालिकेच्या अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मान्यतेने बदलीस पात्र असलेल्या १५२ कनिष्ठ अभियंता, ४४४ दुय्यम अभियंता आणि ९९ सहाय्यक अभियंता अशा एकूण ६९५ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी (ता. ६) महापालिका प्रशासनाने दिली.
पदोन्नती आणि पदस्थापना प्रक्रिया, प्रशासकीय आवश्यकता, रिक्त पदांची उपलब्धता, अभियंत्यांकडून प्राप्त झालेले विनंती अर्ज तसेच विभागाकडून प्राप्त शिफारशी या सर्व बाबींचा विचार करून ही बदली प्रक्रिया पारदर्शक, निःपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. या ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे बदली व्यवस्थेत पारदर्शकता व सुसूत्रता येण्यास मदत झाली असून, अभियंत्यांना महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. बदली पात्र अभियंत्यांनी ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून आपल्या पसंतीचे प्राधान्यक्रम नोंदविले होते. त्या पैकी १५२ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत), ४४४ दुय्यम अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत) आणि ९९ साहाय्यक अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत) यांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे कार्यादेशदेखील निर्गमित करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.