

मिठाईपेक्षा कच्च्या मालावर एफडीएची मोठी कारवाई!
खवा, मावा, काजू, बदाम, खाद्यतेलासह १७.८२ टन साठा जप्त; राज्यभरात ४३ परवाने निलंबित, ६३.०९ लाखांचा माल ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दिवाळीच्या मिठाई आणि फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या साठवणुकीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, भिवंडी आणि वसई परिसरातून खवा, मावा, काजू, बदाम, पामोलीन तेलासह मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्यात महामार्गावरून वाहतूक होत असलेल्या दोन वाहनांतून तब्बल तीन हजार ९३५ किलो खवा आणि मिठाई पकडण्यात आली. राज्यभरात ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी राबविलेल्या विशेष मोहिमेत एकूण १७ हजार ८२४ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ६३ लाख ९ हजार २८५ रुपये आहे.
या कारवाईत कोकण विभाग आघाडीवर राहिला. येथे तब्बल १३ हजार ९७०.९ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत ५४ लाख ५२ हजार २७५ रुपये आहे. यामध्ये वसईतून चार हजार १९३ किलो मावा, खवा आणि मिठाई जप्त करण्यात आली. त्याची किंमत आठ लाख ९२ हजार ४५० रुपये आहे. वसईतील अन्य एका ठिकाणाहून ४०७ किलो खवा-मावा, तर कामण परिसरातून एख हजार ३६ किलो फराळाचे पदार्थ जप्त करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतून एक हजार ५७०.४ किलो फरसाण, लसूण चिवडा आणि पामोलीन तेल, तर ठाण्यातील भिवंडी येथून एक हजार ३०० किलो काजू कतलीचा साठा ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान, राज्यातील सात विभागांतील ७३ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यात ४३ परवाने निलंबित करण्यात आले. नागपूर विभागात सर्वाधिक १८, नाशिकमध्ये ९, बृहन्मुंबईत ५, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी ३, अमरावतीत ३ आणि कोकण विभागात २ परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय १० खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. बोरिवली आणि भांडुप येथील पाच प्रकरणांत ७० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
विभाग.. जप्त साठा..किंमत
कोकण १३,९७०.९ किलो ५४.५२ लाख
पुणे ३,१४२ किलो ५.६६ लाख
छत्रपती संभाजीनगर ६५२ किलो २.३३ लाख
बृहन्मुंबई २३.५ किलो ४४,३००
अमरावती ३६.५ किलो १३,१४०
एकूण १७,८२४ किलो ६३.०९ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.