दुष्काळग्रस्तांसाठी २ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

दुष्काळग्रस्तांसाठी २ कोटी १५ लाखांची मदत जाहीर
Published on: 

मुंबई, ता. ८ : संगीताचे सूर, भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधणाऱ्या सुगी ग्रुपच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला यंदा १० हजारांहून अधिक रसिकांनी उपस्थिती लावली. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रविवारी झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी दोन कोटी १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेता व निवेदक संकर्षण कऱ्हाडे आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. अभि मुंडे यांच्या काव्य सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मकरंद अनासपुरे यांची विशेष उपस्थिती होती.

जाहीर केलेल्या मदतीपैकी परिजात फाउंडेशन, नाम फाउंडेशन, ग्राममंगल आणि सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट यांना प्रत्येकी ५१ लाख रुपये, तर महाजप फाउंडेशनला ११ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

सुगी ग्रुपचे संस्थापक निशांत देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा वाढता बोजा ही चिंतेची बाब आहे. आगामी आठ महिने आव्हानात्मक असणार आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.
संगीताचा आनंद देतानाच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारी ही दिवाळी पहाट मुंबईकरांसाठी संस्मरणीय ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.