

बांधकाम प्रदूषणाला ‘श्वास’चा लगाम
बारकोड स्कॅन करून तक्रार नोंदवता येणार; नियमभंग करणाऱ्या विकासकांना नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकामाधीन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या (एसआरए) माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने कंबर कसली आहे. त्यानुसार एखाद्या एसआरए प्रकल्पाच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाबाबतच्या नियमावलीचे पालन केले जात नसेल, तर त्याबाबत रहिवाशांना एसआरएकडे थेट तक्रार करता यावी म्हणून ‘श्वास’ म्हणजेच एसआरए हब फाॅर वाॅचिंग एअर पोल्यूशन अराउंड कंस्ट्रक्शन साइट (एसएचडब्यूएएएस) हे स्वतंत्र अॅप्लिकेशन सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना बांधकाम साइटवरील बारकोड स्कॅन करून सहजपणे आपली तक्रार नोंदवता येणार आहे.
सध्या मुंबई शहर आणि उपनगरात एसआरए अंतर्गत जवळपास ६२३ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुरू आहेत. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काढलेल्या परिपत्रकाच्या आधारे त्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकाम साइटवर ग्रीन नेट लावणे, धुळीवर नियंत्रणासाठी स्प्रिंकलर यंत्रणा ठेवणे बंधनकारक आहे, मात्र त्याला न जुमाणणाऱ्या ११६ ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजन न केल्याचे आढळल्याने एसआरएने त्यांना काम थांबवण्याची नोटीस दिली आहे. त्यानंतर आता नागरिकांच्या सहभागातून प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी एसआएने ‘श्वास’ अॅप सुरू केले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक बांधकाम साइटवर बारकोड लावण्यात आले आहेत. त्यामुळे सदर साइटवर प्रदूषणाबाबतच्या नियमांची पालन होत नसेल, तर नागरिकांना सदरचा बारकोड स्कॅन करून थेट तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच आपल्या तक्रारीसोबत फोटोही अपलोड करता येणार असल्याची माहिती एसआरएचे उपमुख्य अभियंता रामा मिटकर यांनी दिली.
प्रकल्पांवर नजर ठेवता येणार
एखाद्या प्रकल्पाच्या ठिकाणी होत असलेल्या प्रदूषणाबाबत किंवा नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याबाबत नागरिकांनी एसआरएच्या श्वास या ॲपवर तक्रार केल्यास संबंधित विकसकाला नोटीस बजावून कारवाई केली जाईल. त्यानंतर त्याने सदरच्या त्रुटी दूर करून त्याचे फोटो अॅपवर अपलोड केल्यानंतरच त्याला काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. या अॅपमुळे प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर तातडीने नजर ठेवता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.