

एनसीएमसी कार्डचा खासगी बँकेला लाभ!
एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी कार्डच्या टॉप-अपच्या माध्यमातून प्रवाशांकडून जमा होणारी हजारो कोटी रुपयांची रक्कम खासगी बँकेच्या खात्यात राहणार असल्याने या निधीवरील व्याजाचा मोठा आर्थिक लाभ संबंधित बँकेला होणार असल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले, ‘‘एसटीच्या खात्यात थेट पैसे वळवता येत नाहीत. त्यासाठी भागीदार म्हणून बँक आवश्यक आहे. एनएसडीएल बँकेचे हे टॉप-अप वॉलेट आहे. पैसे प्रवाशाच्या टॉप-अप वॉलेटमध्येच असतात. त्यावर व्याज मिळत नाही. त्यांच्याकडे एक ते दोन महिने पैसे पडून राहत नाहीत. तिकीट काढल्यानंतर तिकिटाचे पैसे एसटीच्या खात्यात वर्ग करण्यात येतात.’’
एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, एनसीएमसी कार्डधारकांना वर्षभरात एसट प्रवासासाठी लागणाऱ्या अंदाजे रकमेइतका टॉप-अप करावा लागणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी दीर्घकाळ खासगी बँकेकडे जमा राहण्याची शक्यता आहे. या रकमेवर मिळणारे शेकडो कोटी रुपयांचे व्याज एसटी महामंडळाला मिळण्याऐवजी खासगी बँकेच्या फायद्यात जाणार असल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे. महामंडळाने निविदा अथवा कंत्राट निश्चित करताना प्रवाशांकडून जमा होणारी ही रक्कम स्वतःच्या खात्यात ठेवण्याची तरतूद केली असती, तर त्यातून मिळणाऱ्या व्याजाचा लाभ थेट एसटीला झाला असता, मात्र ‘प्रवासी एसटीचा, पैसा एसटीचा; पण त्यावरील आर्थिक फायदा खासगी कंपनीचा’ असा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण निविदा प्रक्रियेची, कंत्राटाच्या अटींची, निधीच्या प्रवाहाची आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
...
पडताळणी होणे आवश्यक!
हजारो कोटींच्या निधीचा दावा, व्याजातून होणारा संभाव्य लाभ आणि कंत्राटातील प्रत्यक्ष आर्थिक तरतुदी यांची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पडताळणी होणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.