

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी ५०० कोटींचा निधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत निश्चित ठरवून दिलेल्या वेळेत कार्यान्वित झालेल्या पात्र सौरऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य (एसजीएफ) मंजूर केले आहे. हा निधी महावितरणला दिला जाणार आहे. त्यामुळे सौर कृषी वहिनी योजनेला चालना मिळणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना सुरू केली आहे. त्यानुसार १६,००० मेगावॅट विकेंद्रित सौर क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या पीएम-कुसुम घटक योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या प्रकल्पांना ३० टक्के म्हणजेच १.५ कोटी रुपये प्रति मेगावॉट केंद्रीय आर्थिक सहाय्य दिले जाते. आतापर्यंत या योजनेत ५,३८५ मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यापैकी ३,३२४ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांना केंद्रीय आर्थिक साहाय्य मंजूर झाले आहे, मात्र महाराष्ट्राचे लक्ष्य मर्यादित असल्याने ज्या प्रकल्पांना केंद्राकडून आर्थिक सहाय्य मिळणार नाही, अशा पात्र प्रकल्पांना त्याच धर्तीवर राज्य सरकारने ३० टक्के आर्थिक देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ५०० कोटींचा निधी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महावितरणला देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.