प्रवाशाच्या तक्रारीनंतर रॅपिडो चालकाचे खाते निलंबित

प्रवाशाच्या तक्रारीनंतर रॅपिडो चालकाचे खाते निलंबित
Published on: 

प्रवाशाच्या तक्रारीनंतर रॅपिडोचालकाचे खाते निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ऑनलाइन दुचाकी प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या रॅपिडोच्या चालकाने प्रवाशाकडे एक हजार ८०० रुपयांची बेकायदा मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विनोद मिश्रा (वाहन क्रमांक : एमएच ४८ डी क्यू ६७९२) असे संबंधित चालकाचे नाव आहे. प्रवाशाने केलेल्या तक्रारीनंतर रॅपिडो कंपनीने संबंधित चालकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरून निलंबित केल्याची माहिती दिली आहे.

प्रवाशाच्या तक्रारीनुसार, संबंधित चालकाने प्रवासाचे बुकिंग स्वीकारले; मात्र प्रत्यक्ष प्रवास सुरू न करता एकाच ठिकाणी थांबून राहिला. त्यानंतर प्रवासासाठी ऑनलाइन ॲपमध्ये दाखविण्यात आलेल्या भाड्याऐवजी एक हजार ८०० रुपये रोख स्वरूपात देण्याची मागणी चालकाने केली. या प्रकारामुळे प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागला. तसेच प्रवास रद्द केल्यास त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचाही प्रश्न निर्माण झाला.
याप्रकरणी प्रवाशाने कंपनीकडे तक्रार करत संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. चालकाला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, त्याचे वाहन व खाते रद्द करावे आणि प्रवाशाकडून आकारण्यात आलेले रद्दीकरण शुल्क माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, रॅपिडो कंपनीने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. चालकाने अनधिकृत पैसे मागणे आणि प्रवास सुरू करण्यास नकार देणे हे गंभीर गैरवर्तन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. संबंधित चालकाला प्लॅटफॉर्मवरून निलंबित करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. तसेच प्रवाशाच्या रद्दीकरण शुल्काची तपासणी करून आवश्यक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे. प्रवाशांनी ॲपवरून बुकिंग करताना दाखविलेल्या भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम मागितल्यास संबंधित कंपनीकडे तक्रार करण्याचे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.