छटपूजेसाठी पश्चिम रेल्वेचे ४४४ गाड्यांचे नियोजन

छटपूजेसाठी पश्चिम रेल्वेचे ४४४ गाड्यांचे नियोजन
Published on: 

छठपूजेसाठी पश्चिम रेल्वेचे ४४४ गाड्यांचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढू लागली आहे. उत्तर आणि पूर्व भारतात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने पुढील पाच दिवसांसाठी विशेष नियोजन केले आहे. ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान मुंबई सेंट्रल विभागातून नियमित आणि विशेष मिळून ४४४ मेल-एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येणार आहेत. या कालावधीत सुमारे १३ लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतील, असा अंदाज आहे. यामध्ये उत्तर आणि पूर्व भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे एक लाख ४० हजार असेल.

उधना स्थानकावरही प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्थानकातून नियमित आणि विशेष मिळून ४५ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांमधून सुमारे एक लाख २७ हजार प्रवासी प्रवास करतील. याशिवाय उत्तर आणि पूर्व भारताच्या दिशेने जाणाऱ्या ३३ गाड्यांमधून ८९ हजार ३१० प्रवाशांची वाहतूक अपेक्षित आहे. मुंबई सेंट्रल विभागातून ९ नोव्हेंबरला ७८ गाड्या धावल्या. त्यातून सुमारे एक लाख ८८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर १० नोव्हेंबरला ८२, ११ नोव्हेंबरला ७६, १२ नोव्हेंबरला ७४ आणि १३ नोव्हेंबरला ७९ गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. उत्तर आणि पूर्व भारताच्या दिशेने जाणाऱ्या ५७ गाड्यांचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. त्यातून एक लाख ४० हजार ६६० प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.