घनकचरा व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी ७२.५७ लाखांचा खर्च

घनकचरा व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी ७२.५७ लाखांचा खर्च
Published on: 

घनकचरा व्यवस्थापन जनजागृतीसाठी ७२.५७ लाखांचा खर्च
मुंबई, ता. ११ : मुंबईतील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांत प्रमुख ठिकाणी २५ डिजिटल एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. या स्क्रीनवर कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे नियम, दंडात्मक कारवाई, सार्वजनिक आरोग्य तसेच महापालिकेच्या विविध योजनांची माहिती प्रसारित केली जाणार आहे. या कामासाठी महापालिका ७२ लाख ५७ हजार ७०८ रुपये खर्च करणार असून, स्थायी समितीने यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

महापालिकेने १७ मार्च २०२६ पासून ‘मुंबई क्लीन लीग’ ही स्वच्छता स्पर्धा सुरू केली आहे. नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपनियम २०२५ची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून डिजिटल स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्क्रीनवर ‘मुंबई क्लीन लीग’ची माहिती, स्वच्छतेचे संदेश, नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी दंडात्मक कारवाई, प्रभागातील महत्त्वाच्या सूचना आणि नागरिकांसाठी उपलब्ध सेवांची माहिती दाखविण्यात येईल. तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून सविस्तर माहिती आणि तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.