विनयभंगाला विरोध केल्याने लोकलमधून ढकलले!

विनयभंगाला विरोध केल्याने लोकलमधून ढकलले!
Published on: 

विनयभंगाला विरोध केल्याने लोकलमधून ढकलले!
नायगाव स्थानकातील घटना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : लोकल प्रवासादरम्यान विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला आरोपीने धावत्या लोकलमधून ढकलल्याची धक्कादायक घटना नायगाव रेल्वे स्थानकात घडली. या घटनेत महिला दोन डब्यांमधील फटीतून थेट रेल्वे रुळांवर पडली. त्याच वेळी लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली आला आणि कोपराजवळून तुटला.
गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने वसई येथील जनसेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता, मात्र दोन दिवसांनंतर रुग्णालयात नोंदविलेल्या महिलेच्या जबाबातून विनयभंगाला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले. याप्रकरणी भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी ५३ वर्षीय आरोपीला पाच दिवसांनी अटक केली. ४ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी नायगाव स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ही महिला जखमी अवस्थेत आढळली. ती बोरिवलीहून नायगावच्या दिशेने लोकलने प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान एका अनोळखी पुरुष प्रवाशाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. नायगाव स्थानकात उतरल्यानंतर महिलेने त्याला जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. या वेळी दोघांनीही एकमेकांच्या दिशेने चपला फेकल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
...
आरोपीला अटक
महिलेच्या जबाबानंतर भाईंदर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी भाईंदर लोहमार्ग पोलिस आणि वसई रोड रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त तपास केला. स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली. अखेर ९ नोव्हेंबरला नायगाव पूर्व येथील ५३ वर्षीय रहिवाशाला अटक करण्यात आली. सध्या आरोपी भाईंदर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.