

वरिष्ठ पदांवर केवळ १४ टक्के महिला!
सीआयईएल एचआरच्या अहवालातील निष्कर्ष
मुंबई, ता. १२ : देशातील कंपन्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या पदांवर महिलांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ नेतृत्व स्तरावर महिलांचा वाटा १४.७ टक्के असला, तरी उच्च व्यवस्थापकीय पदांवर हे प्रमाण केवळ ९.६ टक्के आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदांवर अवघ्या ८.७ टक्के महिला कार्यरत आहेत. सीआयईएल एचआरच्या ‘स्टेट ऑफ लीडरशिप इन इंडिया २०२६’ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, देशातील ८० हजार वरिष्ठ पदांपैकी ३८ हजार पदे सीईओंची आहेत; मात्र या महत्त्वाच्या पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या पदांवर महिलांना संधी मिळण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज या आकडेवारीतून अधोरेखित होते. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये (जीसीसी) महिला नेतृत्वाचे प्रमाण तुलनेने अधिक म्हणजे २२.९ टक्के आहे; मात्र एकूण वरिष्ठ नेतृत्वाच्या तुलनेत हे प्रमाणही कमीच आहे. महिलांचे नेतृत्वातील प्रतिनिधित्व वाढवणे आणि वरिष्ठ पदांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे या अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होते.
....
बाहेरील उमेदवारांना अधिक प्राधान्य
वरिष्ठ पदांवरील नियुक्त्यांमध्ये कंपन्या अंतर्गत कर्मचाऱ्यांपेक्षा बाहेरील उमेदवारांना अधिक प्राधान्य देत असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. देशातील ८० हजार वरिष्ठ पदांपैकी ८२.६ टक्के पदांवर बाहेरील उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. तसेच वरिष्ठ नेतृत्वातील मोजक्याच अधिकाऱ्यांनी जनरेटिव्ह एआयशी संबंधित कौशल्ये आत्मसात केली आहेत.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.