

नव्या ई-मिडी बससाठी करार
बेस्टचा ताफ्यात १,५०० गाड्यांची भर पडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईकरांचा बसप्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १,५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसगाड्यांची भर पडणार आहे. या बसगाड्यांच्या पुरवठ्यासाठी आज (ता. १२) बेस्ट भवन येथे दोन कंपन्यांसोबत करार करण्यात आला.
केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावर या बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून, मार्च २०२७ पासून त्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात येणार आहे. मार्च २०२८ पर्यंत सर्व बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. नऊ मीटर लांबीच्या या बसगाड्यांपैकी १,०५० बसगाड्यांचा पुरवठा मेसर्स मुंबई विद्युत वाहन ऑपरेशन प्रा. लि. कंपनीकडून, तर ४५० बसगाड्यांचा पुरवठा मेसर्स साईग्रीन ईव्हीएम प्रा. लि. कंपनीकडून केला जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या बसगाड्यांचा वापर प्रामुख्याने मेट्रो स्थानकांपासून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे मेट्रोची जोडवाहतूक सक्षम होण्याबरोबरच अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवरील बससेवाही अधिक सुलभ होणार आहे. या बसगाड्यांसाठी १२ वर्षांचा करार करण्यात आला आहे. मार्च २०२७ पर्यंत सुमारे २२५ बस दाखल होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर उर्वरित बसगाड्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील. नव्या बसगाड्यांमुळे बेस्टच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक बळ मिळणार आहे.
...
सुविधा अशा
प्रत्येक बसमध्ये २८ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची स्वतंत्र जागा आणि स्वयंचलित रॅम्प असेल. एका चार्जिंगमध्ये या बस किमान २०० किलोमीटर धावू शकतील. तसेच ३६० अंश सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग, फायर डिटेक्शन सिस्टीम, डिस्क ब्रेक आणि प्रत्येक आसनाजवळ यूएसबी चार्जिंगची सुविधा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.