

बाइक टॅक्सी चालकांवर नियंत्रण कुणाचे?
कर्नाटकातील प्रकारानंतर मुंबईतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : कर्नाटकमध्ये रॅपिडो दुचाकी टॅक्सीच्या चालकाला पिकअपसाठी महिला प्रवाशाने फोन करून माहिती विचारली असता, त्याने संबंधित महिलेच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती. मुंबईतही मोठ्या प्रमाणात महिला बाइक टॅक्सीचा वापर करतात. त्यामुळे भविष्यात महिला सुरक्षेचा प्रश्न समोर येऊ शकतो.
कर्नाटकमधील प्रकरणानंतर संबंधित चालकाला तातडीने हटवण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण रॅपिडोकडून देण्यात आले. कंपनीच्या या स्पष्टीकरणानंतरही प्रश्न कायम आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज वाहतूक तज्ञांनी व्यक्त केली आहे.
चालकांची माहिती देण्यास टाळाटाळ
रॅपिडो कंपनीने वडाळा आरटीओ येथे ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता, परंतु अद्यापही शासनाच्या धोरणातील अटी व निकष पूर्ण करण्यात कंपनी यशस्वी ठरलेली नाही. विशेषतः रॅपिडोचालकांची माहिती कळवणे आवश्यक आहे, मात्र रॅपिडो कंपनीकडून अद्यापही वडाळा आरटीओला याबाबत कोणती माहिती देण्यात आलेली नाही. त्याबाबत पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद दिला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बाइक-टॅक्सी कंपन्यांकडून चालकांची पोलिस पडताळणी होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक चालक म्हणून कार्यरत आहेत. राज्य सरकार याकडे डोळेझाक करते.
- संजय नाईक, अध्यक्ष
मनसे वाहतूक सेना
महिलांचा प्रवास सुरक्षित असणे ही बाइक टॅक्सी कंपन्यांची जबाबदारी आहे. सरकारनेही कंपन्यांसाठी कडक सुरक्षा नियम तयार करून त्यांची योग्य अंमलबजावणी करावी. महिलांना सुरक्षित प्रवासाचा विश्वास मिळाला पाहिजे.
सुशील पठारे, वाहतूक अभ्यासक, परिसर
महिलांनी रॅपिडोद्वारे प्रवास करताना चालकाचा फोटो, गाडीचा नंबर हे तपासून पाहिले पाहिजे. प्रवासादरम्यान जीपीएस लोकेशन ऑन करून कुटुंबातील व्यक्तींना शेअर केले पाहिजे.
- वर्षा विद्या विलास,
सामाजिक कार्यकर्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.