मधुमेहाचा वाढता विळखा

मधुमेहाचा वाढता विळखा
Published on: 

जागतिक मधुमेह दिन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, आता कमी वयातील व्यक्तींनाही या आजाराचा धोका वाढत असल्याचे नव्या विश्लेषणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे आजाराची ठळक लक्षणे दिसण्यापूर्वीच नियमित आरोग्य तपासणीदरम्यान अनेकांना मधुमेहाचे निदान होत आहे. कोविडपूर्व आणि कोविडनंतरच्या पाच वर्षांतील रुग्णांच्या आकडेवारीची तुलना केली असता, कमी कालावधीत निदान होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील झांडा हेल्थकेअरच्या विश्लेषणात मार्च २०१५ ते मार्च २०२० या कोविडपूर्व कालावधीतील ७,२७४ रुग्णांच्या नोंदींची तुलना एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ या कोविडनंतरच्या कालावधीतील ८,६९२ रुग्णांच्या नोंदींशी करण्यात आली. या दोन कालावधीत रुग्णालयातील एकूण भेटींची संख्या अनुक्रमे ४५,०८३ आणि ५३,१२७ होती.

नव्याने मधुमेहाचे निदान झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत आजाराचे निदान झालेल्या रुग्णांचे प्रमाण कोविडपूर्व काळात २४ टक्के होते. कोविडनंतर ते ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचले. म्हणजेच नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

तरुण वयोगटात मधुमेहाचे निदान होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात अनेक रुग्णांना आजाराची ठळक लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे केवळ लक्षणांवर अवलंबून न राहता नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
- डॉ. राजीव कोविल, मधुमेह आणि स्थूलताविषयक तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.