क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनचा ४५६ कोटींचा आयपीओ

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनचा ४५६ कोटींचा आयपीओ
Published on: 

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनचा ४५६ कोटींचा आयपीओ

मुंबई, ता. १३ : कृषी बियाणे तसेच कीटकनाशक यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या आयपीओसाठी २५९ ते २७२ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
हा आयपीओ ४५६ कोटी रुपयांचा असून, गुंतवणूकदारांना किमान ५५ शेअर व त्यापुढे ५५च्या पटीत शेअरसाठी गुंतवणूक करावी लागेल. १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येईल, असे कंपनीचे अध्यक्ष अंकुर अग्रवाल म्हणाले. नुकत्याच संपलेला आर्थिक वर्षातील कंपनीचा महसूल ३,१५१ कोटी आहे. मागील वर्षात तो २,६९० कोटी रुपये होता. त्यात यावर्षी १७ टक्के वाढ झाली. कंपनीची निर्यात सुमारे ५२५ कोटी रुपयांची आहे. इशूमधील ५० टक्के वाटा बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना, ३५ टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांना, तर १५ टक्के वाटा बड्या बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना मिळेल.
कंपनीतर्फे तांदूळ, कापूस वेगवेगळ्या भाज्या, यांच्यासाठी पेटंट घेतलेली कीटकनाशके आहेत. आधी कंपनीकडे फक्त कापसाचे बियाणे होते, मात्र आता त्यांच्याकडे संशोधन आणि विकास क्षेत्राचे मोठे जाळे असून, त्यामार्फत त्यांनी भाज्या, फुले, धान्य यांची संकरित बियाणीदेखील शोधली आहेत. तांदळाच्या संकरित बियाण्याचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. कंपनीकडे दीडशे ते दोनशे शास्त्रज्ञ असून, दरवर्षी ८० ते १०० कोटी रुपये संशोधन आणि विकास यावर खर्च केले जातात. त्यांच्याकडे १४ पेटंट असून, आणखी २८ पेटंटसाठी त्यांनी नोंदणी केली आहे. त्यांच्याकडे एकूण २७५ संकरित बियाणी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.