मुंबईत स्मार्ट पूर पूर्वानुमान प्रणालीची मागणी

मुंबईत स्मार्ट पूर पूर्वानुमान प्रणालीची मागणी
Published on: 

मुंबईत स्मार्ट पूर पूर्वानुमान प्रणाली कार्यान्वित करा!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : ‘पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर पूर्वसूचना देणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सेन्सर्स व रिअल टाइम डेटावर आधारित ‘स्मार्ट पूर पूर्वानुमान आणि नाला निरीक्षण प्रणाली’ तातडीने कार्यान्वित करण्यात यावी,’ अशी मागणी नगरसेविका आयशा वनू यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका प्रशासनाला केली आहे. ही प्रणाली कार्यान्वित केल्यास पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त व्यक्त केला.

महापालिका नालेसफाई आणि इतर उपाययोजना करीत असली तरी अनेक ठिकाणी पूरस्थितीचा अचूक अंदाज व वेळेवर पूर्वसूचना उपलब्ध होत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यास अडचणी निर्माण होतात. पूरस्थितीवर नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हवामान अंदाज, भरती-ओहोटीची माहिती, सेन्सर नेटवर्क व जलपातळी मापन प्रणाली यांचा एकत्रित व प्रभावी वापर करून संभाव्य पूरस्थितीचा पूर्वानुमान घेणे व तत्काळ प्रतिसाद देणारी आधुनिक यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेने स्मार्ट पूर पूर्वानुमान व नाला निरीक्षण प्रणाली विकसित करावी, अशी मागणी आयशा वनू यांनी केली आहे. सभागृहात या ठरावाच्या सूचनेला मंजुरी मिळाल्यास हे तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.