मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक
Published on: 

मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी (ता. १५) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे ते कल्याण अप-डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते कल्याण अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या आणि अर्धजलद लोकल मुलुंड ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील. तसेच कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या आणि अर्धजलद लोकल कल्याण ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे पुन्हा अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.


हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप हार्बर लोकल तसेच सीएसएमटी येथून बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर लोकल रद्द राहतील. याशिवाय पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लोकल तसेच ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर लोकल रद्द राहतील. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. तसेच ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरूळदरम्यान ट्रान्स हार्बर लोकल सेवा सुरू राहतील. पोर्ट मार्गावरील लोकलही नियमितपणे धावतील.

पश्चिम रेल्वे
कुठे : वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.५५ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत
परिणाम : वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान उपनगरीय विभागात रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल, तर रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.