

‘ओरगाटेक इंडिया’चे १९ नोव्हेंबरपासून आयोजन
मुंबई, ता. १५ : कार्यस्थळांची रचना, ऑफिस फर्निचर आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘ओरगाटेक इंडिया २०२६’ या व्यावसायिक प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान हे तीनदिवसीय प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनात १० देशांतील १०० हून अधिक आघाडीचे ब्रँड सहभागी होणार आहेत. कोकुयो, हेवर्थ, नीलकमल एज, गोदरेज इंटिरिओ, फेदरलाइट आणि डोरमाकाबा यांसारख्या कंपन्या आपली आधुनिक उत्पादने सादर करणार आहेत. भारताची ऑफिस फर्निचर बाजारपेठ २०२६ ते २०३१ या काळात वार्षिक ८.५२ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. २०३१ पर्यंत ही बाजारपेठ आठ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. प्रदर्शनात आरामदायी आसनव्यवस्था, मॉड्युलर ऑफिस फर्निचर, ध्वनिव्यवस्था, स्मार्ट लाइटिंग, फ्लोअरिंग, ऑटोमेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्जवर (आयओटी) आधारित आधुनिक कार्यस्थळ तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळेल. याशिवाय विशेष ज्ञानमंचावर देश-विदेशातील आर्किटेक्ट, डिझायनर आणि कार्यस्थळ नियोजन तज्ज्ञांची सत्रे व चर्चासत्रे आयोजित केली जातील. त्यातून भविष्यातील कार्यस्थळांच्या रचनेवर विचारमंथन होईल, अशी माहिती आयोजक कोएल्नमेसेचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद दीक्षित यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.