वाहतूक सुरक्षेसाठी ‘बजाज’ची भागीदारी

वाहतूक सुरक्षेसाठी ‘बजाज’ची भागीदारी
Published on: 

मुंबई, ता. १५ : बजाज जनरल इन्श्युरन्सने (पूर्वीची बजाज अलायन्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी) रस्ता सुरक्षा आणि जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांसोबत भागीदारी केली आहे.

या भागीदारीअंतर्गत, कंपनीने पुण्यातील येरवडा बजाज जनरल मेट्रो स्थानकावर डिजिटल शाखेचे उदघाटन केले. यामुळे प्रवाशांना वाहन विम्याची महत्त्वाची माहिती तसेच रस्ते अपघातांच्या वेळी उपलब्ध असलेल्या मदत उपक्रमांची माहिती सहजतेने मिळेल. तसेच वाहन मालकांना त्यांच्या थर्ड-पार्टी (टीपी) वाहन विम्याची वैधता सहजपणे तपासता येईल. प्रवासी केवळ क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या वाहनाची टीपी विमा पॉलिसी सक्रिय आहे की नाही हे तपासू शकतात आणि आवश्यकता असल्यास काही मिनिटांतच डिजिटल पद्धतीने नवीन पॉलिसी खरेदी करू शकतात.

देशात थर्ड-पार्टी मोटर इन्श्युरन्स अनिवार्य आहे. रस्ता अपघातात बाधित झालेल्या त्रयस्थाला आर्थिक संरक्षण देण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तरीही भारतीय रस्त्यांवर आजही मोठ्या संख्येने वाहने वैध विम्याशिवाय धावत आहेत. त्यामुळे अपघातग्रस्तांना आर्थिक दायित्वांचा सामना करावा लागू शकतो आणि नुकसानभरपाई मिळवण्यासाठी मर्यादित पर्याय राहतात. यासंदर्भात ही जनजागृती मोहीम आहे, असे बजाज जनरल इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ डॉ. तपन सिंघेल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.