

मुंबईतील पहिले भूमिगत स्वच्छतागृह
काळा घोडा येथे कलादालनही उभारणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक काळा घोडा परिसरातील पादचारी मार्ग मोकळा करण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लायन गेटजवळील सध्याचे आकांक्षी शौचालय आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्या हटवून त्या ठिकाणी मुंबईतील पहिले भूमिगत सार्वजनिक स्वच्छतागृह आणि कलादालन उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पामुळे जमिनीवरील बांधकामांचे अडथळे दूर होऊन काळा घोडा परिसराचे सौंदर्य जपण्यासह पादचाऱ्यांना मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. लायन गेट परिसरातील सध्याच्या बांधकामांमुळे पादचारी मार्ग अरुंद झाला असून, ऐतिहासिक परिसराच्या सौंदर्यालाही बाधा पोहोचत होती. याबाबत भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी २० ऑक्टोबरला आयुक्तांना पत्र लिहून शौचालय हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने भूमिगत सुविधेचा प्रस्ताव तयार केला. त्याला आता आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
प्रस्तावित आराखड्यानुसार, एकूण १,६६८ चौरस मीटर क्षेत्रफळात ही सुविधा विकसित केली जाणार आहे. नागरिकांना प्रवेशासाठी दोन लहान प्रवेशद्वारे उभारण्यात येतील. तेथून सरकत्या जिन्यांच्या माध्यमातून आत जाता येईल. यामध्ये ४७० चौरस मीटर क्षेत्रफळाचे कलादालन आणि व्यावसायिक जागा, ३३० चौरस मीटरचे उपाहारगृह, २५५ चौरस मीटरची महापालिका चौकी आणि ये-जा व अन्य सुविधांसाठी ५२० चौरस मीटर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महिलांसाठी ५०, तर पुरुषांसाठी ४३ चौरस मीटर क्षेत्रफळाची स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.
...
महत्त्वाचा निर्णय!
भूमिगत स्वच्छतागृह, कलादालन, कॅफे आणि अन्य सुविधांमुळे परिसराच्या पर्यटन व सांस्कृतिक महत्त्वात भर पडणार आहे. जमिनीवरील अडथळे हटवून काळा घोड्याचे ऐतिहासिक सौंदर्य जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.