

प्रिन्स विल्यम यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक निर्बंध
दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांवरील पार्किंग बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि वेल्सच्या राजकुमारी केट मिडलटन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात येणार असून, काही मार्गांवर प्रवेशबंदी आणि पार्किंग निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
प्रिन्स विल्यम आणि राजकुमारी केट १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत असणार आहेत. या दौऱ्यात ते अर्थशॉट पुरस्कार शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दक्षिण वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी मोटार वाहन कायद्यानुसार यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. त्यानुसार, सोमवारी (ता. १६) मादाम कामा मार्गावरील हुतात्मा राजगुरू चौकातून फ्री प्रेस रोडकडे जाणारे उजवे वळण तसेच फ्री प्रेस रोडवरील यू-टर्न केवळ व्हीव्हीआयपी वाहनांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. शहीद भगतसिंग मार्गावरून अवतारसिंग बेदी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना वाळचंद हिराचंद मार्गावर तसेच बॅलार्ड पिअर येथील वाहन उतरण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी उजवे वळण घेता येणार नाही. एन. मोरारजी मार्गावर उत्तर-दक्षिण दिशेने सर्वसामान्य वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, विनय के. शाह मार्गावर एनसीपीए चौक ते मुरली देवरा चौक आणि दोराबजी टाटा मार्गावर गेंडा पॉइंट ते मुरली देवरा चौक या परिसरातील पे अँड पार्क सुविधा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सोमवारी एन. मोरारजी मार्ग, जे. एन. हेरिडिया मार्ग आणि वाळचंद हिराचंद मार्गावर वाहनांना पार्किंग करण्यास मनाई असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.