उबर-महिंद्राची ई-रिक्षांसाठी भागीदारी

उबर-महिंद्राची ई-रिक्षांसाठी भागीदारी
Published on: 

मुंबई, ता. १७ : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी उबरने महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत पुढील १२ महिन्यांत महिंद्राच्या पाच हजार इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर वाढविण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीतील आर्थिक अडचणी दूर करून रिक्षाचालकांना ई-वाहनांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर या उपक्रमाचा भर असेल.

दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘ईव्ही ऑटो ॲडव्हांटेज’ असे या कार्यक्रमाचे नाव असून, त्याअंतर्गत रिक्षाचालकांना वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठा, जुन्या वाहनांच्या बदल्यात सवलती (ट्रेड-इन इन्सेंटिव्ह) आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आवश्यक सहकार्य दिले जाणार आहे.

‘उबर’चे ग्लोबल हेड ऑफ मोबिलिटी प्रदीप परमेश्वरन म्हणाले, शहरी वाहतुकीचे भविष्य सार्वजनिक वाहतूक आणि सामाईक प्रवास व्यवस्थेच्या एकत्रित वापरावर अवलंबून आहे. महिंद्रासोबतची भागीदारी इलेक्ट्रिक वाहतुकीला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा यांनी सांगितले, चालक आणि व्यावसायिकांसाठी इलेक्ट्रिक वाहने आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरल्यासच या बदलाला व्यापक स्वरूप मिळेल.

दिल्लीपासून सुरुवात
मुंबईत ‘अर्थशॉट वीक’च्या पार्श्वभूमीवर उबरने ‘कनेक्टेड जर्नीज’ ही सुविधाही सादर केली. या माध्यमातून मेट्रो, रिक्षा आणि दुचाकी प्रवासाचे पर्याय एकाच ॲपवर उपलब्ध होतील. प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, अंदाजित वेळ आणि भाडे पाहता येईल. ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू होत असून, सुरुवात दिल्लीपासून करण्यात आली आहे. उबरच्या ॲपवर मुंबईसह दिल्ली, बंगळूर, चेन्नई आणि पुणे येथे मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.