

श्वान हल्ल्यांना आळा घालण्याचे आदेश
न्यायालयाने प्रतिज्ञापत्रही सादर करण्यास सांगितले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : कांदिवली पूर्वेतील निवासी संकुलात भटक्या श्वानांच्या हल्ल्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभरात ५०हून अधिक श्वानदंशाच्या घटना घडूनही महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची बाब याचिकेतून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने मुंबई महापालिकेला या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर तपशील सादर करण्याचेही आदेश दिले.
कांदिवली पूर्व येथील शिवालिक टॉवर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेने वकील गौरव चौबे यांच्यामार्फत याचिका केली आहे. या प्रकरणात नागरिकांना असलेला धोका कायम असून, तो दिवसेंदिवस वाढत असल्याचे चौबे यांनी मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याची माहिती न्यायालयात बाजू मांडताना महापालिकेने दिली. संबंधित दोन श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण केल्याचेही सांगितले, मात्र लसीकरण करून प्रश्न सुटणार नसल्याचे अधोरेखित करून खंडपीठाने या घटना रोखण्यासाठी आणखी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच पुढील सुनावणीपूर्वी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यास सांगितले.
...
याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे
- संबंधित निवासी संकुलात सुमारे दोन हजार रहिवासी असून, जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत श्वानांच्या चावण्याच्या ५०हून अधिक घटना घडल्याचा दावा याचिकेत केला आहे
- रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचे याचिकाकर्त्यांचा दावा
- रहिवाशांच्या तक्रारीनंतर मे महिन्यात महापालिकेच्या पथकाने दोन श्वानांना पकडले होते, मात्र त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात आल्याने हल्ल्यांचे सत्र सुरूच राहिल्याचा आरोप
- याचिका दाखल केल्यानंतरही श्वानांच्या चावण्याच्या आणखी तीन घटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.