पालिकेच्या डिजिटल शिक्षणाचा फज्जा!

पालिकेच्या डिजिटल शिक्षणाचा फज्जा!
Published on: 

पालिकेच्या डिजिटल शिक्षणाचा फज्जा!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा गाजावाजा करीत सुमारे ३७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूम प्रकल्पातील त्रुटी उघड झाल्या आहेत. तब्बल १,३०० वर्गखोल्यांमध्ये ६५ इंची डिजिटल पॅनेल बसविण्यात आले असले, तरी आवश्यक शैक्षणिक डिजिटल सामग्री (ई-कंटेंट) उपलब्ध नसल्याने ही उपकरणे विद्यार्थ्यांच्या उपयोगाविना पडून असल्याचा आरोप नगरसेवक अंकित प्रभू यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कार्यादेश देऊन वर्ष उलटले तरी अनेक पॅनेलवर ई-कंटेंट अपलोड झालेले नाही. ‘सीबीएसई’ शाळांमध्ये ही समस्या अधिक असून, राज्य मंडळाच्या शाळांमध्येही अद्ययावत अभ्यासक्रमानुसार सामग्री उपलब्ध नसल्याचे प्रभू यांनी निदर्शनास आणले आहे. निविदेनुसार विविध माध्यमांसह राज्य मंडळ, सीबीएसई, आयबी, आयसीएसई आणि आयजीसीएसई अभ्यासक्रमांचे ई-कंटेंट देणे बंधनकारक होते. विशेष म्हणजे, प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी २८ कोटी १८ लाख रुपये म्हणजेच ७६ टक्के रक्कम कंत्राटदारांना अदा करण्यात आली आहे. शाळानिहाय ई-कंटेंटची माहिती द्यावी, दोषी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी, उर्वरित देयके रोखावीत आणि उपकरणांच्या दर्जाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे. शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबतही प्रशासनाने खुलासा करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.