

कुंभमेळ्यापूर्वी रेल्वेचा वेग वाढणार
इगतपुरी-मनमाड मार्गावरील मर्यादा हटवली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने इगतपुरी-मनमाड मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बाणगंगा पुलाजवळील रेल्वे मार्गाच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून लागू असलेली ताशी ७५ किलोमीटर वेगाची मर्यादा हटविण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावर गाड्यांना ताशी १३० किलोमीटर वेगाने धावता येणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १६ नोव्हेंबरला कसबे सुकेणे यार्डातील बाणगंगा पुलाच्या भुसावळ बाजूकडील रेल्वे मार्गात सुधारणा करण्याचे काम पूर्ण केले. या ठिकाणी रेल्वे रुळांच्या रचनेत अनावश्यक वळण असल्याने गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली होती. हे वळण सुमारे ४३ मीटर लांबीपर्यंत सरळ करण्यात आले. तसेच पॉइंट क्रमांक १०१बी सुमारे ३३० मिलिमीटरने हलविण्यात आला. क्रॉसओव्हर क्रमांक १०२ए आणि १०२बी काढून मुख्य रेल्वे मार्गही सुमारे ३५० मिलिमीटरने सरकविण्यात आला. त्यामुळे पुलाच्या सुरुवातीपासून पुढील मार्गापर्यंत रुळांची रचना सरळ आणि सलग झाली आहे.
...
विशेष गाड्यांना फायदा
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या काळात नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे. वेगमर्यादा हटविल्यामुळे गाड्यांचा प्रवास अधिक वेगाने होण्यासह वेळापत्रकाचे पालन करणे शक्य होईल. तसेच अतिरिक्त विशेष गाड्या चालविणे आणि प्रवाशांची वाढती गर्दी हाताळणे अधिक सुलभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.