

बुलेट ट्रेनच्या मार्गाला आता विजेची गती
सुरत-बिलिमोरा टप्प्यात उद्यापासून ओव्हरहेड वायर सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात आता विजेचा प्रवास सुरू होणार आहे. सुरत ते बिलिमोरा दरम्यानच्या सुमारे ५० किलोमीटरच्या मार्गावर शुक्रवारी (ता. २०) ओव्हरहेड वायरमध्ये वीजप्रवाह सुरू करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असून, या मार्गावरील उन्नत रेल्वे मार्गाच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर विद्युत यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
मुंबई-अहमदाबाद यादरम्यानचा ५०८ किलोमीटरचा बुलेट ट्रेन मार्ग अत्याधुनिक विद्युत प्रणालीवर आधारित आहे. यासाठी २×२५ केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण मार्गाला वीजपुरवठा करण्यासाठी १४ ट्रॅक्शन सबस्टेशन उभारण्यात येत आहेत. या केंद्रांद्वारे वीज घेऊन ती ओव्हरहेड वायरपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ओव्हरहेड वायरमध्ये वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर संबंधित मार्गावरील तारांत कायम वीज राहणार आहे. त्यामुळे मार्गालगतच्या रहिवाशांनी, प्रवाशांनी आणि बांधकाम कामगारांनी विद्युत तारांपासून दूर राहावे. तारांना किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये, तसेच परिसरात बेकायदा काम करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीकृत केंद्रातून नियंत्रण
संपूर्ण विद्युत यंत्रणेवर केंद्रीकृत नियंत्रण केंद्रातून देखरेख ठेवली जाणार आहे. वीजपुरवठ्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन एकाच ठिकाणाहून केले जाणार असल्याने सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.