नांदगाव येथे पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगाव येथे पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
नांदगाव येथे पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव येथे पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

sakal_logo
By

मुरूड, ता. ५ (बातमीदार) : मुरूड पोलिस ठाणे हद्दीत नांदगाव सुरूल पेठ वरच्या मोहल्ल्यात राहणाऱ्या आरोपीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव येथील सुरूळपेठ वरचा मोहल्ला येथे सनान स्टोअर्स हे जनरल मालाचे दुकान आहे. या दुकानात एक सात वर्षाची मुलगी सामोशांची पट्टी आणण्यासाठी आली होती. आरोपी नाझीम युसूफ कारबारी याने मुलीला दुकानात बोलावून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत मुलीच्या आईने मुरूड पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधा बाल लैंगिक अत्याचार पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला मुरूड न्यायालयात दाखल केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती मुरूड पोलिसांनी दिली. याबाबतचा अधिक तपास मुरूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन वाणी करत आहेत.