अनधिकृत बांधकामाचा विळखा

अनधिकृत बांधकामाचा विळखा

मुरूड, ता. ९ (बातमीदार) : मुरूड नगरपालिका हद्दीतील मारुती नाका रस्ता दिंडी तळामार्ग येथील अदनान मेडिकल या इमारतीच्या मागील बाजूस अनिधकृत बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामासाठी मुरूड नगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. अशा बांधकामावर पालिकेने कारवाई करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे सामजिक कार्यकर्ते श्रीकांत सुर्वे यांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडे केली आहे.
अधिकाराच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामाची माहिती मागवून कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. मुरूड नगरपालिका बांधकाम विभागाकडून अभिलेखा पडताळणी केली असता त्यात कोणतीही कागदपत्रे आढळून येत नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नगरपालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी अनिधकृत बांधकाम होत आहे. त्यामुळ मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी हे बांधकाम ताबडतोब पाडून मुरूडकरांसमोर आदर्श कायम ठेवावा, अशी निवेदनातून सुर्वे यांनी मागणी केली आहे. यापूर्वीही नगरपालिकेकडून नगरपरिषद अधिनियम कलम ५२ व ५३ कलमान्वये कारवाईच्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत; मात्र ठोस कारवाई कुठेच झालेली नाही. तरी मुख्याधिकार्‍यांनी या अर्जाचा विचार करून अनधिकृत बांधकाम तोडावे, असे निवेदनात नमूद केले आहे. मुरूडच्या नगररचनाकार साहिल मुजावर यांची बदली झाल्यानंतर अनधिकृत बांधकामे वाढत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com