नवाबकालीन इदगाहवर दोन हजार बांधवांची नमाज अदा

नवाबकालीन इदगाहवर दोन हजार बांधवांची नमाज अदा

मुरूड (बातमीदार) : मुरूड शहरात ईदची पहिली नमाज नवाबकालीन इदगाहवर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून ईदीच्या शुभेच्छा दिल्या. जंजिरा संस्थानचे तत्कालिन नबाब सर सिद्दी अहमद खान यांनी १९३८ मध्ये मुरूडच्या मुस्लिम बांधवांना बकरी ईदप्रित्यर्थ भेट दिली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ३५० मीटर उंचीवर ही ऐतिहासिक इदगाह स्थापत्य शास्त्राचा अजब नमुना आहे. इदगाहची नमाज होताच मुरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सकपाळ आणि पोलिस सहकाऱ्यांनी उपस्थितांना गुलाबपुष्प देत ईदीच्या शुभेच्छा दिल्या. राजपुरीचे मुस्लिम बांधव सकाळी ७ वाजता ईदची पहिली नमाज ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यासमोरील इदगाहवर अदा करून शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com