एकदरा खाडीत मासळी उतरवताना दमछाक

एकदरा खाडीत मासळी उतरवताना दमछाक
Published on

एकदरा खाडीत मासळी उतरवताना दमछाक


मुरूड, ता. २८ (बातमीदार) ः एकदरा गावातील मच्छीमारांना बोटी किनाऱ्यावर लावताना मोठी कसरत करावी लागते. खाडी पात्र गाळाने भरल्‍याने ओहोटीच्या वेळी मच्छिमारांची पुरती दमछाक होते. या खाडीकिनारी शेकडो बोटी लावल्‍या जात असून गाळातून बोटी काढताना त्‍यांचे नुकसान होत असलयाने नाईलाजाने मच्छीमारांना खोल समुद्रातच बोटी नांगराव्या लागत आहेत.
खाडी किनारी एकाच वेळी १५०-२०० होड्या थांबू शकत नाहीत. किनाऱ्यांपासून लांब, बोटी नांगरल्‍यास मासळी उतरताना महिला - पुरुषांना कसरत करावी लागते. मासळीचेही नुकसान होते. त्‍यामुळे एकदरा खाडी गाळमुक्त करावी, गाळ काढून खाडी रुंद व खोलगट करावी, जेणेकरून मच्छिमार बोटी सहज किनार्‌यावर उभ्या करणे शक्य होईल. यासाठी ग्रोयन्स बंधारा उभारणे चांगला पर्याय असल्‍याने मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे.
अनेक वर्षांपासून मुरूड-एकदरा परिसरात ग्रोयन्स बंधाऱ्याची मागणी प्रलंबित आहे. कोरोना काळापूर्वी एकदरा खाडीतील गाळ काढण्यासाठी कोट्‌यवधींचा निधी खर्च करण्यात आला होता, मात्र आता परिस्‍थिती जैसे थे आहे.

खाडीतील गाळ काढणे हा तात्‍पुरता पर्याय आहे. मात्र याठिकाणी ग्रोयन्स बंधारा बांधून कायमस्वरूपी उपाययोजांची गरज आहे. तत्कालीन बंदर विभाग मंत्री महादेव जानकर तसेच आयुक्तांनी ग्रोयन्स बंधाऱ्याचा प्रस्ताव मंजूर ही केला होता, मात्र पुढील कार्यवाही झालेली नाही.
- मनोहर बैले, कार्यकारिणी सदस्‍य, राज्‍य मच्छीमार संघ

मुरूड ः बोटी खोल समुद्रात लावल्‍याने मासळी उतरवताना महिलांची दमछाक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com