फणसाड अभयारण्यात रानकुत्र्यांचा वावर

फणसाड अभयारण्यात रानकुत्र्यांचा वावर

मुरूड, ता. ४ (बातमीदार) ः तालुक्यातील ५४ चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेले फणसाड अभयारण्य जैवविविधतेने नटले आहे. अभयारण्यात जवळपास २५ ठिकाणी पाणवठे असल्याने मुबलक वन्यसंपदेबरोबरच वन्यजीवांना वावर दिवसेंदिवस वाढतो आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे २०२० पासून फणसाडमध्ये रानगव्यांची संख्या वाढली असून जवळपास २० असल्‍याचे निरीक्षणात आढळले आहे. याशिवाय दुर्मिळ रानकुत्र्यांची संख्याही वाढल्‍याचे दिसून येत आहे. रानससा, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हा हे वन्यप्राणी अभयारण्यात नियमित आढळतात.
रानकुत्रे हे अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहेत. सह्याद्रीच्या खोऱ्यात त्यांचा वावर प्रामुख्याने दक्षिणेकडील पट्ट्यांमध्ये आढळतो, परंतु आता प्रथमच उत्तर-पश्चिम घाटातही रानकुत्र्यांच्या अधिवासाची नोंद करण्यात आली आहे. फणसाड अभयारण्यातही या प्राण्याचा वावर आढळला आहे. २०२० मध्ये वनसंरक्षकांनी रानकुत्र्यांच्या अधिवासासंबंधी अभयारण्यात अभ्यास सुरू केला आहे.

मनोऱ्यावरून निरीक्षण
अभयारण्य क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. यात दोन वेळा रानकुत्र्यांचे छायाचित्र टिपण्यात आले होते. शिवाय पाणवठ्यावरही ठसे आढळले आहेत. बुधवारी (ता. ३) फणसाडमधील मनोऱ्यावरून निरीक्षण करताना दोन रानकुत्रे आढळून आले. एका कॅमेऱ्याने रानकुत्रा टिपता आला, तर दुसरा पळाल्‍याची माहिती अभयारण्य वनसरंक्षक तुषार काळभोर यांनी दिली.

मुरूड ः फणसाड अभयारण्यात रानकुत्र्यांचा वावर वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com