

मुरूड, ता. १५ (बातमीदार)ः भोगेश्वर पाखाडीत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी मुरूड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार होता; पण प्रशासनाने आंदोलनाला कोणतीही परवानगी नसून जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिला आहे.
मुरूड शहरात झालेल्या दगडफेकीनंतर दोन समाजांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर मुरूड शहरातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. याच पार्श्वभूमीवर शहरातील शांतता कायम राखण्यासाठी रविवारी मुरूड तहसील कार्यालयात शांतता सभा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. यावेळी मुरूड तहसीलदार रोहन शिंदे, डीवायएसपी विनीत चौधरी, मुरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, एलआयबी प्रमुख मकरंद पाटील, सहाय्यक फौजदार नीलेश गिरी यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे नेते तसेच मुरूड शहरातील नागरिक तसेच मुस्लिम समाजाचे नेतेही उपस्थित होते. यावेळी घडलेल्या घटनेचा निषेध मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून करण्यात आला. तर हिंदू समाजाच्या वतीनेही सलोखा कायम राखण्यासाठी या मोर्चात सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
-----------------------------------------------------------
भावना भडकावल्यास कारवाई
मुरूड शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर व्हॉट्सॲपवर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीच्या दुकानातूनच वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला आहे. या प्रकारातून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने पोलिसांनी अज्ञात महिलेवर सी.आर. नंबर ११९/२४ भारतीय न्याय संहिता ३५३ (क)(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, समाजमाध्यमांवर भावना भडकवणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.